0
Your Cart

About Us

सखी स्पर्श !

सखी स्पर्श बद्दल सांगते .....

दोन मैत्रिणी, एक आवड आणि एक छोटंसं स्वप्न … प्रत्येक सुंदर गोष्टीची सुरुवात एका छोट्याशा विचारातून होते.

"Sakhi Sparsh" ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली.

आम्ही रुचिता आणि ऐश्वर्या… दोन मैत्रिणी! आम्हा दोघींनाही साड्यांची खूप आवड. साड्यांचे रंग, त्यांचे सुंदर नमुने, वेगवेगळे प्रकार आणि त्यात दडलेलं भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आम्हाला नेहमीच आकर्षित करत आलं.

एकदा सहज गप्पा मारताना मनात विचार आला… आपल्याला साड्या इतक्या आवडतात, तर हीच आवड आपण एका सुंदर व्यवसायात का बदलू नये?

आणि तिथून जन्म झाला एका छोट्याशा स्वप्नाचा… Sakhi Sparsh!

'सखी' म्हणजे मैत्रीण आणि 'स्पर्श' म्हणजे आपुलकीची जाणीव. आमच्या मैत्रीतून सुरू झालेल्या या प्रवासाला आम्ही नाव दिलं – सखी स्पर्श!

आमचं स्वप्न, आमचा प्रयत्न…

आज साड्यांच्या बाजारात अनेक सुंदर ब्रँड्स आणि पर्याय उपलब्ध आहेत. अशा स्पर्धेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नाही, याची आम्हाला जाणीव आहे.पण आमचा विचार अगदी साधा आहे.साडी नेसायची आवड असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या आवडीची, सुंदर आणि दर्जेदार साडी परवडणाऱ्या किमतीत मिळावी. साडी घेण्यासाठी प्रत्येक वेळी मोठं बजेट असण्याची गरज भासू नये.

म्हणूनच आम्ही साडी निवडताना तिचं सौंदर्य, गुणवत्ता आणि किंमत या तिन्ही गोष्टींचा विचार करतो. प्रत्येक सखीच्या बजेटमध्ये बसेल अशा वेगवेगळ्या किमतींच्या साड्या आमच्या कलेक्शनमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

कारण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रत्येक सखीने आपल्या आवडीची साडी आनंदाने निवडावी!

सखी स्पर्शमधला आणखी एक छोटासा आनंद…

आमच्या साड्यांच्या पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडी पिशव्या आम्ही बाजारातून किंवा दुकानातून खरेदी करण्याऐवजी "Aai Day Care Sanstha "या संस्थेकडून घेतो.

या माध्यमातून संस्थेच्या विशेष मुलांनी केलेल्या कामाला प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या प्रयत्नांना आमच्याकडून छोटासा हातभार लागावा, हा त्यामागचा प्रामाणिक विचार आहे.

आमच्या मते, व्यवसाय करताना फक्त स्वतःची प्रगती न करता आपल्या परीने समाजासाठीही काहीतरी करता आलं, तर त्या यशाचा आनंद आणखी मोठा असतो.

आमच्यासाठी तुम्ही फक्त ग्राहक नाही…

तुम्ही आमच्या या छोट्याशा स्वप्नाचा एक महत्त्वाचा भाग आहात. तुमचा प्रत्येक ऑर्डर, प्रत्येक अभिप्राय आणि प्रत्येक वेळी दाखवलेला विश्वास आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो.

आज हा प्रवास छोटा असेल, पण त्यामागचं स्वप्न मोठं आहे.

आम्हाला आशा आहे की आमच्या या प्रवासात तुम्हीही आमच्या सखी बनून सोबत राहाल.

With Love,

रुचिता आणि ऐश्वर्या Founders – Sakhi Sparsh

सखी स्पर्श – प्रत्येक सखीच्या हौसेचा, आनंदाचा आणि प्रेमाचा स्पर्श!